marathiformat.com
MarathiFormat.com मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत!
मी अॅड. रविंद्र सुभाष पाटील, व्यवसायाने वकील असून माझे मूळ गाव वडगाव टेक, ता. पाचोरा, जि. जळगाव आहे. मी सन २०१५ मध्ये बी.ए. एलएल.बी. पदवी पूर्ण केली असून कायद्याच्या क्षेत्रात अनेक वर्षांचा व्यावहारिक अनुभव घेतला आहे.
माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खाजगी वकिली करत असतांना प्रकरण तयार करतांना नमुने नसल्याने अडचण येणे. काही कायदेशीर मुद्दे माहितीचा अभाव असणे . या गोष्टीची जाणीव झाली . सन जून २०२३ ते २०२५ पर्यंत रेल्वे न्यायालय, मनमाड येथे सुमारे अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या काळात विविध प्रकारच्या कायदेशीर प्रकरणांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कायदेशीर अडचणी अधिक जवळून समजून घेता आल्या.
याच अनुभवाच्या आधारे MarathiFormat.com ची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश म्हणजे मराठी भाषिक नागरिकांना कायदेशीर माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून देणे तसेच विविध प्रकारचे उपयुक्त दस्तऐवज आणि नमुने एकाच ठिकाणी प्रदान करणे.
MarathiFormat.com वर प्रकाशित होणारी माहिती शक्य तितकी अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त ठेवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. तथापि, प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कायदेशीर निर्णयापूर्वी पात्र वकिलाचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मराठी भाषेत दर्जेदार कायदेशीर माहिती, उपयुक्त दस्तऐवज आणि व्यवहार्य मार्गदर्शन उपलब्ध करून देत प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्कांची आणि कायदेशीर प्रक्रियेची योग्य माहिती मिळावी, हेच आमचे ध्येय आहे.
आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
– अॅड. रविंद्र सुभाष पाटीलसंस्थापक, www.MarathiFormat.com